Type Here to Get Search Results !

कर्तृत्ववान महिलांनी समाजास परिवर्तनाची दिशा दाखवली : डॉ. दिपाली काळे


सोलापूर : सामाजिक जीवनात स्त्रियांना अनेक माध्यमातून दुय्यम दर्जा दिला गेला. त्यामुळे सामाजिक मानसिक खच्चीकरण झालं. त्यावर कर्तृत्ववान महिलांनी प्रबोधन करून समाज परिवर्तन घडविले. दुय्यमत्व सांगणाऱ्या बाबी हद्दपार केल्या पाहिजेत व कर्तृत्ववान महिलांचा आदर्श घेतला पाहिजे, असं प्रतिपादन पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे यांनी केले.

फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय संस्थापिका पद्मविभूषण आवाबाई वाडिया स्मृती कर्तृत्वशालिनी महिला पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी दमाणी रक्त संकलन केंद्राच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.  मंगला जोशी-चिंचोळकर या होत्या. 

व्यासपीठावर मार्गदर्शक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, डायरेक्टर सांख्यिकी विभाग मुंबईच्या उषा राधाकृष्णन, दमाणी रक्त संकलन केंद्राचे सेक्रेटरी जयेश पटेल, सोलापूर शाखेचे चेअरपर्सन प्रा.डॉ. एन. बी.तेली, व्हाईस चेअरपर्सन प्रा. डॉ. आयेशा रंगरेज, फायनान्स ॲडव्हायझर सपना चिट्टे, सदस्या  विजया महाजन, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड आदी उपस्थित होते.  

प्रारंभी डॉ. ज्योती चिडगुपकर, मीनाक्षी बिराजदार, काजल सिंदगी, लक्ष्मी बंडगर, अमरजा थिटे यांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कै.आवाबाई वाडिया कर्तृत्वशालिनी पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, शाल व बुके असे पुरस्काराचे स्वरूप होते.

अध्यक्षीय समारोप करताना ॲड. मंगला जोशी-चिंचोळकर म्हणाल्या की, कर्तृत्वशालिनी  महिलांनी आपले कार्यक्षेत्र निवडून त्यामध्ये मोलाचे योगदान दिले, त्यातूनच त्या वंदनीय ठरल्या. यावेळी पुरस्कार प्राप्त महिलांनीही आपलं मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. नभा काकडे यांनी केले. कर्तृत्वशालिनी महिलांचा परिचय प्रा. डॉ. विजया महाजन यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुगतरत्न गायकवाड यांनी केले तर प्रा. डॉ. आयेशा रंगरेज यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.


फोटो ओळी -

सोलापूर : जागतिक महिला दिनानिमित्त पद्मविभूषण आवाबाई वाडिया स्मृती कर्तृत्वशालिनी महिला पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार प्राप्त महिलांसमवेत डॉ. दिपाली काळे, ॲड. मंगला जोशी-चिंचोळकर, प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, उषा राधाकृष्णन, जयेश पटेल, प्रा. डॉ. एन. बी. तेली, प्रा. डॉ. आयेशा रंगरेज, सपना चिट्टे, विजया महाजन, सुगतरत्न गायकवाड आदी छायाचित्रात दिसत आहेत.