Type Here to Get Search Results !

जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पुर्ततेसाठी विशेष मोहिम



सोलापूर  :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे मार्फत आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही मोहिम जिल्ह्यात ०५ मार्चपासून सुरू करण्यात आलीय. ती ११ मार्चपर्यंत या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात सकाळी ११ ते ०५ वाजेपर्यंत राहणार आहे. ज्या अर्जदारांना शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर अर्ज प्रकरण त्रुटीत असल्याचा ई-मेल संदेश प्राप्त झाला, अशा प्रस्तावधारकांनी त्रुटी पूर्ण करण्यासाठी कार्यालयीन वेळेत हजर राहून त्रुटीची पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सचिन कवले यांनी केले आहे.