Type Here to Get Search Results !

बँक ऑफ महाराष्ट्र, सोलापूर झोन मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा


सोलापूर :  बँक ऑफ महाराष्ट्र, सोलापूर झोन मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन खूप उत्साहाने साजरा केला गेला. ज्यामध्ये  बँक ऑफ महाराष्ट्राच्या सर्व महिला कर्मचारी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर 'ताण-तणाव व्यवस्थापन' वर योग शिक्षिका श्रीमती वंदना शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महिला दिनाच्या विशेष भेटवस्तू देण्यात आल्या. 



बँक ऑफ महाराष्ट्राच्या माजी कर्मचारी सौ. शोभा मोरे मॅडम यांनी आर्थिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. सौ. शोभा मोरे मॅडम या मनोरमा सखी मंच, सोलापूर या मनीषा माध्यमातून खूप सारे महिलांविषयी जनजागृती करत आहेत. 



श्रीराम जावरे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले. शेवटी संजय वाघ (विभागीय प्रबंधक, सोलापूर विभाग) यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त केले.