Type Here to Get Search Results !

मंगळवेढा तालुक्यात करावा दुष्काळ जाहिर : आ. प्रणिती शिंदे यांची मागणी




आमदार शिंदे यांचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन

 सोलापूर : जिल्ह्यात यंदाच्या साली सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडलेला आहे. मंगळवेढा तालुक्यात गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिकांचे नुकसान झालंआहे, त्यामुळे तालुक्यात दुष्काळाची भीषण स्थिती निर्माण झालीय. सर्वत्र पाण्याची तीव्र टंचाई  असून शासनाने मंगळवेढा तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करावा, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलीय. 

कमी पावसामुळे जनावरांच्या चारा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची व जनावरांकरीता चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे. मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ जाहिर करून पाण्याचे टँकर सुरू करणे व जनावरांच्या चारा छावण्यासह दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळणाऱ्या सुविधा तात्काळ मंगळवेढा तालुक्याला उपलब्ध करून देण्यात याव्या .त, असं आमदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी, ०९ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटलंय.

या निवेदनाच्या प्रती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडं पाठविण्यात आले आहेत.