जागतिक महिला दिनी मराठा सेवा संघातर्फे महिलांचा सत्कार
सोलापूर : महिलांनी राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आचरणात आणावेत, असे आवाहन मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केले.
मराठा सेवा संघाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी शिवश्री पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, नितीन जाधव, राजू व्यवहारे, रमेश जाधव, राम माने, प्रकाश डोंगरे, आर. पी. पाटील, नितीन मोहिते, सचिन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
आजवरचा महामातांचा इतिहास पाहिला तर जिजाऊ, सावित्रीमाई, अहिल्याराणी, माता रमाई यांनी मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांच्या याच आदर्शावर आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. मुलगा, मुलगी असा दुजाभाव न करता त्यांना योग्य शिक्षण द्यावे. विज्ञानवादी दृष्टिकोन ठेऊन कर्मकांड आणि अंधश्रद्धा यांचा बिमोड केला पाहिजे, असे पाटील म्हणाले.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या लता ढेरे, अभिंजली जाधव, डॉ. संजीवनी मुळे, सुनिता पाटील, रूपाली ननवरे, मानसी सुरवसे, वर्षाराणी पवार, सुवर्णा महाडिक, वैशाली पवार, अंजली सुरवसे, दीपाली जाधव, श्रद्धा माने, पूजा जाधव, कोमल जाधव, साकश्री जाधव, आरती काकडे, अन्नपूर्णा जाधव, पल्लवी चौरे, वैशाली डोंगरे, विजया राऊत, सिंधू व्यवहारे, जान्हवी पवार, योगिता शिंदे, प्रीती कदम, अॅड. दीपा भोसले या महिलांचा पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष सदाशिव पवार यांनी केले. सचिव प्रा.लक्ष्मण महाडिक यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.