सोलापूर : हाताचा पंजा हातामध्ये धरुन, 'हात दिखाओ' असे म्हणत एका साधूने हाताचे बोटातील सोन्याची अंगठी हातचलाखीनं चोरून नेलीय. ही घटना सिद्धेश्वर मंदिराज जवळील होम मैदानाच्या पटांगणात शनिवारी दुपारी घडलीय. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दमाणी नगर-मरीआई चौकातील नवनीत अपार्टमेंटमधील रहिवासी ओंकार उदय वैद्य (वय ३७ वर्षे) पु. ना. गाडगीळ दुकानातील सेल्सहेड जोशी यांच्या आईस दुकानाचे चारचाकी वाहनातून देवदर्शनासाठी श्री सिध्देश्वर मंदिर येथे घेऊन गेले होते. वाहन होम मैदानात पार्किंगच्या ठिकाणी पार्किंग करत असताना एक अज्ञात साधु वाहनाजवळ आला.
त्या साधूने खिडकीतून हात घालून ओंकार वैद्य यांचा हात हातामध्ये घेऊन ' हात दिखाओ ' असे म्हणत, हाती हात घेऊन हातचलाखीने बोटातील चार ग्रॅम सोने वजनाची अंगठी काढून घेतली. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हाताची करामत दाखविलेल्या अज्ञात साधू रूपात आलेल्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्या अंगठीची सरकारी किंमत १५ हजार रुपयाहून अधिक असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. पोलीस हवालदार नदाफ या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.