भीमा-सीना नदीच्या कृतज्ञतेसाठी शिवरात्रीनिमित्ताने कुडल येथे संगम आरती
सोलापूर : आध्यात्मिक पर्यटनातून विकास शक्य आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडल येथील हरिहरेश्वर आणि संगमेश्वर हे प्राचीन मंदिर असून, मंदिरास धार्मिक पर्यटन क्षेत्र बनविणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
महाशिवरात्रीनिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथे नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी, ०८ मार्च रोजी सायंकाळी संगम आरती आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. प्रारंभी आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते यांच्या हस्ते संगम आरती करण्यात आली.
प्रारंभी दीपप्रज्वलन करून नदीला नैवेद्य अर्पण करण्यात आले. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. प्रारंभी संगमेश्वर मंदिरापासून ते संगम घाटापर्यंत संबळाच्या निनादात आरती आणण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सूर्यास्ताच्या वेळी काशीच्या धर्तीवर भीमा-सीना नद्यांच्या संगम घाटावर भक्तिमय वातावरणात संगम आरती करण्यात आली.
कृषी संस्कृतीचा विकास व्हावा, भीमा-सीना संगम नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह अखंड वाहत रहावा, नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संगमेश्वर देवस्थान समिती आणि भक्त मंडळांच्या वतीने संगम आरती आयोजित करण्यात आली होती. यंदाचं आरतीचे पाचवे वर्ष आहे.
मंदिर परिसरातील स्वामी समर्थ मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, हनुमान मंदिर येथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी देवस्थान समिती आणि आडत व्यापारी मल्लिकार्जुन बिराजदार यांच्यावतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. बिराजदार हे गेल्या २१ वर्षापासून हे महाप्रसाद व्यवस्था करीत आले आहेत.
संगम आरतीस डॉ. चनगोंडा हविनाळे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक वहाणे, निपाणी, मल्लिकार्जून बिराजदार, सिद्धाराम उमदी, हणमंत कुलकर्णी, मळसिद्ध मुगळे, आणप्पा बाराचारे, गुरण्णा तेली, कॉन्ट्रॅक्टर फड, संगप्पा केरके, आण्णाराव पाटील, मल्लप्पा पाटील, चन्नप्पा बगले, पंडीत पुजारी, निजामोद्दीन बिराजदार, शरणप्पा बिराजदार, देविन्द्रप्पा पाटील, संगप्पा केरके, आडत व्यापारी मल्लिनाथ बिराजदार, हणमंत बगले उपस्थित होते. सूत्रसंचालन हणमंत बगले, प्रास्ताविक संगप्पा केरके यांनी तर अण्णाराव पाटील यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.
फोटो ओळ : हत्तरसंग कुडल संगम येथे संगम आरती करताना आमदार सुभाष देशमुख यांच्यासह मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत.