सोलापूर/रमजान मुलाणी
अलिकडं वाढदिवस साजरा करण्याच्या अनेक पध्दती प्रचलित आहेत, मात्र वाढदिवस साजरा करायचं म्हटलं तर अन्य काहीही असलं तरी फटाके फोडणे अन् केक कापणं, निश्चित असतं. या प्रथेला शेतकरी मित्रांनी बगल देत आपल्या शेतकरी मित्राचा वाढदिवस कलिंगड कापून साजरा केलाय.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील भुमिपूत्र योगीराज काशिनाथ भोज या शेतकऱ्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं बुधवारी सायंकाळी साजरा केलाय. केक अर्थातच पाश्चात्य रिती भातीचं प्रतिक... ! मातीत घाम गाळणाऱ्या शेतात केक पिकत नाही, मात्र कलिंगड पिकतं. ते कोणत्याही शेतात पिकलं तरी, त्याची किंमत त्या शेतकऱ्याच्या खिशात जाते, ही भावना त्यामागे असावी, रुसे दिसतं.
हा विचार करुन योगीराज भोज यांच्या मित्रपरिवारानं त्यांच्या वाढदिवसाला केक ऐवजी कलिंगड आणलं, ते कापून त्याची फोड भरवून योगीराज यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
यावेळी सचिन शिरसागर, महादेव सोनटक्के. गणेश गरड, श्याम हुडकर, रमजान मुलाणी, शिवाजी पांढरे, परमेश्वर डांगे, अनिल खंडागळे, अनिल जाधव यांच्यासह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.