संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिध्द साहित्यिक कृष्णा इंगोले यांची निवड
सोलापूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक कृष्णकांत चव्हाण यांना जाहीर झाला असल्याचे साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याचबरोबर देशभक्त संभाजीराव गरड कॉलेज मोहोळचे उपप्राचार्य हरिदास गवळी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत,(कोंडी ) रवींद्र खंदारे (सातारा) राजू म्हस्के (बीड) प्रा. इंद्रजित पाटील (बार्शी) दस्तगिर जमादार (सोलापूर) आदी जणांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे,
१५ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन, ११ मार्च २०२४ रोजी " शिवस्मारक'' येथे संपन्न होणार आहे, या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिध्द साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आलीय.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहास व साहित्यिक पैलूचा प्रचार व प्रसार व्हावा, म्हणून या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते, उद्घाटन समारंभ परिसंवाद, कविसंमेलन असे संमेलनाचे स्वरूप असून राज्यभरातील साहित्यिक या संमेलनास हजेरी लावणार आहेत,
तुका म्हणे (कोश) गावरंग,गावजागर,परिघावरच्या पाऊलखुणा, ग्रामीण साहित्य आणि वास्तव, लोकसंस्कृतील स्त्रीरूपे, आस्थेची माणसं, लोकवाणीतील अमृतधन, माणदेशी साहित्य, यासह १५ ग्रंथाचे लेखन डॉ.कृष्णा इंगोले यांनी केले असून आजवर विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
...... चौकट .......
छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी
दैनिक ' पुण्यनगरी ' चे कृष्णकांत चव्हाण, प्रा. हरिदास गवळी, सोमनाथ राऊत, दस्तगीर जमादार, रवींद्र खंदारे (सातारा), राजू म्हस्के (बीड), प्रा. इंद्रजित पाटील (बार्शी) यांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.