Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे शहराध्यक्ष बिरप्पा बंडगर तर कार्याध्यक्ष मुसा अत्तार


सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षपदाची धुरा सुधीर खरटमल यांनी सांभाळल्यापासून जुन्या आणि नवीन यांचा समन्वय साधत नवीन नियुक्त्या केल्या जात आहेत, त्याच पद्धतीने सुधीर खरटमल यांनी बिरप्पा बंडगर व मुसा आत्तार यांची शिफारस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्याकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी सेलच्या शहराध्यक्षपदी बिरप्पा बंडगर तर कार्याध्यक्षपदी मुसा आत्ता यांची नियुक्ती ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी केली.

गेल्या १०-१२ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शरदचंद्र पवार यांचा विचार व नेतृत्वावर विश्वास ठेऊन अतिशय प्रामाणिकपणे बिरप्पा बंडगर व मुसा अत्तार यांनी पक्षवाढीसाठी काम केलं आहे. शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते शनिवारी नियुक्ती पत्र  देण्यात आले.

यावेळी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, जनरल सरचिटणीस चंद्रकांत पवार, प्रा. राहुल बोळकोटे, लखन गावडे, शफी मणियार, रियाज अत्तार, सरफराज मणियार, श्रीकांत तुरा, अल्ताफ शेख, युसूफ अत्तार, हमुलाल शेख, गणेश सलगर, सिध्दलिंग नवले, प्रदिप घागरे, आंबादास कोंडा, मनोहर गुरव, मुस्ताक शेख आदी उपस्थित होते.