🟣 दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या, जनतेशी संवाद साधण्यासाठी गावभेट दौरा
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीत उभी आहे. यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पहिली महिला खासदार होण्यासाठी आपण संधी द्यावी, अशी विनंती आ. प्रणिती शिंदे यांनी केली.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आ. प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शुक्रवारी, २२ मार्च रोजी यत्नाळ, होटगी, फताटेवाडी, होटगी स्टेशन, आहेरवाडी, बंकलगी, संजवाड, औराद, राजूर, बिरनाळ, होनमुर्गी, सिंदखेड, मद्रे, घोडा तांडा आदी गावांना भेटी दिल्या. या दौऱ्यात ठीक ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आले. आमदार शिंदे यांनी जनतेशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील गांव भेट दौऱ्यात आमदार शिंदे यांनी संवाद साधला साधला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी हितगुज करताना, काडादी यांना त्रास देण्यासाठीच राजकीय सुडातून सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली, असा आरोप करून याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.
या दौऱ्यात जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, तालुका अध्यक्ष हरीश पाटील, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, बाळासाहेब शेळके, अशोक देवकते, राधाकृष्ण पाटील, सुभाष पाटोळे, डॉ. सोमनाथ देशमुख, केदार दिंडूरे, निसार कांबळे, नरसप्पा दिंडूरे, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, अंबादास करगुळे, लक्ष्मण तळेकर, आप्पाशा मंडोली, रमेश तोरणगी, सिद्धाराम गोळेगार, माणिक यलगेरी, मुजीब शेख, अनंत म्हेत्रे, कय्युम बलोलखान, हसीब शेख, राजू जाधव, लाला कांबळे, प्रेम राठोड, किरण सुर्वे, पंडित लांडगे, जोहर शेख, शिवराज पाटील, संजय जाधव, धोंडप्पा तोरणगी, तिरुपती परकीपंडला, वरुण सुर्वे, अमोगसिद्ध बुळगुंडे, बसू गवसाने, तुलसीदास राठोड, शाहरुख बलोलखान, राजू इंगळे, वाघेश म्हेत्रे, जाफर शेख, राजू गडदे, राजू सगरे, धर्मराज गुंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.