Type Here to Get Search Results !

एम के फाऊंडेशनचे महादेव कोगनुरे यांनी जळितग्रस्तांचे पुसले अश्रू


स्वयंपाक घरात ठिणगीने गायकवाड यांच्या प्रपंचाचा झाला कोळसा

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (मंद्रूप) येथील उमेश तुकाराम गायकवाड यांच्या वस्तीवरील घराला गुरुवारी सायंकाळी अचानक स्वयंपाक घरात ठिणगी उडून संपूर्ण प्रपंचाचा कोळसा झाला. या आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य,धान्य, बारदाना, खत, रोख रक्कम जळून खाक झाल्यानं गायकवाड कुटुंबिय उघड्यावर आले. या दुःखदायक घटनेची माहिती एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना मिळताच औज (मंद्रूप) येथील वस्तीवर जाऊन उमेश गायकवाड कुटुंबीयांची भेट घेऊन आस्थेवाईकपणे विचारपूस करीत संपूर्ण कुटुंबीयांना धीर दिला. 

उमेश गायकवाड यांच्या वस्तीवरील भले मोठे घर बराच वेळ जळत असलेला व्हिडिओ सोशल मिडीयावर पाहून परिसरातील नागरिक ही हळहळ व्यक्त करताना दिसून येत होते. संपूर्ण आयुष्याची पुंजी खर्ची घालून गायकवाड परिवार गेली अनेक वर्षे वस्तीवर घर करुन राहत होते. परंतू बघता-बघता उमेश गायकवाड यांचे संपूर्ण घर आग लागून होत्याचे नव्हते झाले होते. आगीचा लोट इतका प्रचंड होता की आग विझवण्याची संधीच ग्रामस्थांना मिळाली नाही, बघता-बघता संपूर्ण घराची राखरांगोळी झाली. 

गायकवाड कुटुंबियांच्या प्रपंच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने परिसरातील नागरिकांची एकच गर्दी झाली होती. गायकवाड कुटुंबीयांचं दुःख हृदय पिळवटून टाकणारं होतं. या घटनेवर प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत होता.

एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी त्वरित गायकवाड कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस करीत आधार दिला. तेव्हा उमेश गायकवाड परिवारातील सदस्यांचे अश्रु अनावर होताना पहायला मिळाले. नेहमीच अस्मानी संकटात सापडलेल्या सामान्य माणसांना एम के फाउंडेशन च्या माध्यमातून आधार दिला जातो. आज पुन्हा एकदा एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी जळीतग्रस्त उमेश गायकवाड कुटुंबीयांच्या वस्तीवर जाऊन भेट घेऊन आधार दिला. कोगनुरे यांचा प्रयत्न त्यांचे दोन अश्रू पुसण्याचा असला तरी एम के फाउंडेशन चे सर्वत्र कौतुक होताना दिसून आले.