मंद्रूप : दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्षपदी दैनिक संचारचे पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पत्रकार संघाची शनिवारी, सकाळी ११ वाजता बैठक झाली. दैनिक दिव्य मराठीचे ज्येष्ठ पत्रकार अमोगसिध्द लांडगे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
या बैठकीत नूतन अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांची एकमताने अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. नूतन कार्यकारिणीत तालुका उपाध्यक्षपदी महासिध्द साळवे (दैनिक सकाळ), सचिवपदी नितीन वारे (दैनिक लोकमत) आणि कार्याध्यक्षपदी शिवराज मुगळे (दैनिक पुढारी) यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर ज्येष्ठ पत्रकार अमोगसिध्द लांडगे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेच्या नूतन कार्यकारिणीत दिनकर नारायणकर (कोषाध्यक्ष), बबलू शेख (प्रसिध्दी प्रमुख), आनंद बिराजदार (संघटक), अप्पू देशमुख व अशोक सोनकंटले (सहसचिव) आणि महेश पवार, गजानन काळे, बनसिद्ध देशमुख, अभिजीत जवळकोटे, शिवय्या स्वामी, प्रमोद जवळकोटे, बिरु रूपनुरे, कलय्या स्वामी, शिवसिध्द कापसे, संगय्या स्वामी, आरिफ नदाफ, अंबादास कापसे यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आलीय.
विजय देशपांडे, नारायण चव्हाण, राजकुमार सारोळे, अमोगसिध्द लांडगे, विनोद कामतकर, नंदकुमार वारे आणि समीर शेख यांची सल्लागारपदी निवड करण्यात आलीय.
.... चौकट ....
पत्रकारांच्या समस्या-अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध : पंचाक्षरी स्वामी
दक्षिण सोलापूर मधील पत्रकारांच्या समस्या-अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून पत्रकार गृहनिर्माण संस्था आणि पत्रकारांना विमा संरक्षण योजना लागू करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही नूतन अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांनी निवडीनंतर बोलताना दिली.