Type Here to Get Search Results !

पडताळणी झालेल्या पात्र उमेदवारांना तलाठी या पदावर पदस्थापना


सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या आस्थापनेवरील २०० तलाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द करणेत येऊन ऑनलाईन परिक्षा ऑगस्ट व सप्टेंबर-२०२३ मध्ये घेण्यात आली आहे. तलाठी पदभरतीबाबत टीसीएस (TCS) कंपनीकडुन प्राप्त झालेल्या सामान्याकृत गुणाच्या आधारे, २२ जानेवारी २०२४ व २४ जानेवारी २०२४ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकानुसार निवड याद्या व प्रतिक्षा याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

जिल्हयाधिकारी कार्यालयाच्या २२ जानेवारी २०२४ व २४ जानेवारी २०२४ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकानुसार निवड याद्या व प्रतिक्षा यादी प्रसिध्दीच्या अनुषंगाने पात्र उमेदवार यांची, ०८ फेब्रुवारी २०२४  रोजी कागदपत्रे पडताळणी करण्यात आली होती. तथापि, TCS कंपनीकडुन सुधारीत केलेल्या निवडसुचीनुसार  राज्य परिक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त, आणि अतिरिक्त् भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांच्याकडील, ११ मार्च २०२४ चे प्रसिध्दीपत्रकानुसार नुसार सुधारीत यादी प्रसिध्द करणेबाबत निर्देश होते. त्याअनुषंगाने TCS कंपनीकडुन प्राप्त झालेल्या सुधारीत गुणानुक्रम यादीनुसार, १३ मार्च २०२४ रोजी सोलापूर जिल्हयाची सुधारीत निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. 

त्यानुसार यापूर्वी, ०८ फेब्रुवारी २०२४  रोजी ज्या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यापैकी सद्यस्थितीत २०० उमेदवारांपैकी पात्र ११३ उमेदवारांना तलाठी या पदावर पदस्थापना देण्यात आलेली आहे. तसे आदेश काढण्यात आलेले आहेत. इतर समांतर आरक्षण असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत लवकरच कागदपत्रे पडताळणी करुन त्याप्रमाणे पात्र उमेदवारांना पदस्थापना देणेचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.