सोलापूर : शेअर मार्केट व्यवसाय करण्याकरीता गुंतवणुकदाराचा विश्वास संपादन करून १७ लाख ८५ हजार रुपये वेगवेगळ्या खात्यावर जमा करून एका जोडगोळीनं गुंतवणूकदाराची फसवणूक केली. हा प्रकार ०१ ते १५ नोव्हेंबर २०२३ रोजी दरम्यान वेळोवेळी घडलाय. शेअर मार्केट व्यवसायात गुंतवणूक केल्यानंतर त्याचा कोणताही प्रॉफिट व मूळ रक्कम परत न मिळता, टोटल चीटिंग झाल्याने गोपाल दत्तात्रय मिठ्ठा यांनी पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतलीय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की येथील न्यू पाच्छा पेठ, कुचन नगरातील रहिवासी गोपाल दत्तात्रय मिठ्ठा (वय-४० वर्षे) यांची फेसबुक वर मैत्री झालेल्या अनिल शर्मा यांनी फेसबुक वरून stock frontine-G १३ हा शेअर मार्केट ट्रेडीग व्हॉटस अॅप ग्रुप तयार करून त्यामध्ये वेगवेगळे मोबाईल क्रमांक अॅड करून त्याव्दारे संपर्कात आलेल्या गोपाल मिठ्ठा यांचा व्यवसायिक विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते.
त्या आवाहनाला गोपाल मिट्टा यांनी प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठविली. त्यावर गोपाल मिट्टा यांना प्रायमरी अकाऊंट ओपन करण्यास सांगून फिर्यादी यांचेकडून वेगवेगळ्या खात्यावर रक्कम जमा करून घेतली. तसेच कंपनीचा चार्ट मध्ये फिर्यादी यांचे कडून वेगवेगळ्या खात्यावर रक्कम जमा करून घेतली तसेच वेळोवेळी त्या अकाऊंटवर कंपनीचा चार्ट मध्ये फिर्यादी यांनी खरेदी केलेल्या शेअर्स व आयपीओ च्या किंमती वाढल्याचे प्रकाशीत केले.
वेळोवेळी त्या अकाऊंटवर कंपनीचा चार्टमध्ये मिठ्ठा यांनी खरेदी केलेल्या शेअर्स व आयपीओ च्या किंमती वाढल्याचे प्रकाशीत केले, मात्र कसलाही प्रॉफिट मिळून दिलेले नाही. तसेच मिठ्ठा यांनी जमा केलेली मूळ रक्कम १७,८५,००० रूपये इतकी परत केली नाही. शेअर मार्केट मधील गुंतवणुकीच्या नावाखाली आपली टोटल चीटिंग झाली आहे, हे लक्षात आल्यावर गोपाल मिठ्ठा यांनी पोलीस आयुक्तालयाकडील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार अनिल शर्मा, आशिष शहा यांच्याविरुद्ध भादवि ४२०,४१९,३४ सह आय टी अॅक्ट ६६ सी, ६६ डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजा या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.