मंगळवेढा : अनुसूचित जाती-जमाती मागासवर्गीय आयोगाची मान्यता प्राप्त असलेली महाराष्ट्र राज्यातील एकमेव अशी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना, सोलापूर विभाग सोलापूर यांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या मंगळवेढा आगाराची कार्यकारणी निवडीचे पत्र कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या सोलापूर जिल्ह्याचे विभागीय सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांच्या हस्ते तसेच विभागीय अध्यक्ष देवा साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या मंगळवेढा आगाराचे व्यवस्थापक संजय भोसले यांना मंगळवेढा आगाराची २०२४-२५ या वार्षिक सालाकरिता सर्वानुमते बिनविरोध निवड केल्याची पदाधिकाऱ्यांची यादी देण्यात आली.
यावेळी मंगळवेढा आगाराचे व्यवस्थापक श्री संजय भोसले यांना पदाधिकाऱ्यांची निवड यादी देत असताना विभागीय सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे, अध्यक्ष देवा साखरे, मंगळवेढा आगार अध्यक्ष नागनाथ साखरे, सरचिटणीस ईश्वर आठवले, कार्याध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, सल्लागार चंद्रकांत बनसोडे, खजिनदार आशिष वाघमारे, संपर्क प्रमुख सयाजी शिंदे, हेगडे यांच्यासह मंगळवेढा आगारातील अनेक कास्ट्राईब राप. कर्मचारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवेढा आगाराच्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
आगार अध्यक्ष : नागनाथ साखरे, सचिव : ईश्वर आठवले, कार्याध्यक्ष : लक्ष्मण गायकवाड, सहसचिव : सुनील जाधव, उपाध्यक्ष : तातोबा घोडके व दत्तात्रय सोनवणे, खजिनदार : आशिष वाघमारे, सहखजिनदार : कैलास कांबळे, संघटक : अनिल व्हनवटे, सहसंघटक : अनिल सरवदे, संपर्कप्रमुख: सयाजी शिंदे, सल्लागार : चंद्रकांत बनसोडे, सहसल्लागार: गौरीशंकर व्हनमाने, मार्गदर्शक : सिद्धार्थ भंडारे तर चिमराया हेगडे, विजय डोलारे, संजय शिंदे, मिलिंद कसबे, चंद्रकांत मस्के यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. यावेळी मंगळवेढा आगाराचे सरचिटणीस ईश्वर आठवले यांनी सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांचे आभार मानले.