Type Here to Get Search Results !

' सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही होता '



न्यायासनावर तसंच तपास यंत्रणेवर संशयिताचा विश्वास 

सोलापूर : सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, तो व्हिडिओ शेअर केलेल्या व्यक्तिनं, त्या व्हिडिओत, माझ्यावर करण्यात आलेला आरोप निखलाय खोटा आहे. त्या अर्जामागं मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. परंतु ' सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही होता ' असं सांगून माझा न्यायासनावर तसंच पोलीस तपास यंत्रणेवर विश्वास असल्याचं सांगताना एक दिवस सत्य विजयी होणार असंही म्हटलंय. 

त्या व्हिडिओला सोशल मीडियावर प्रसारित करताना, त्या भगिनीला मी ओळखत नाही, मात्र तिच्या कथित भावाशी असलेले 'नाते संबंध' सोलापूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र शासन आणि उच्च न्यायालयाच्या कागदोपत्री नोंद आहेत. त्या मुद्दयावर मी बदनामीला घाबरून माघार घ्यावी, यासाठी एका भगिनीच्या पदराआडून तो अर्ज देण्यात आल्याचेही त्यात सांगितले आहे.

हे सर्व व्हिडिओच्या माध्यमातून समाजापुढे ठेवायला कारण ही तसेच आहे.  त्या व्यक्तीविरुद्ध एका महिलेच्या अर्जावरून सदर बझार पोलीस ठाण्याच्या दफ्तरी शुक्रवारी, ०१ मार्च रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विनयभंगाची घटना ऑक्टोबर २०२३ मध्ये शासकीय रुग्णालयाच्या प्रांगणात आणि फेब्रुवारी च्या अखेरीस गुरुनानक नगर चौकात सकाळी घडल्याचे त्यात म्हटले आहे, 

पहिल्यांदा हा प्रकार भावाला सांगितला तर त्या उभयतामध्ये भांडण होईल, या भीतीपोटी त्या घटनेची वाच्यता केली नव्हती, मात्र गुरुनानक नगर चौकात सकाळी ११ वाजता त्याची पुनरावृत्ती झाल्याने कुटुंबात विचार करून हा अर्ज दाखल करण्यात आल्याचेही पिडितेने म्हटलं आहे. 

समाजातील दुर्बल घटक, सामान्य, मध्यमवर्गीय महिलावर असे प्रसंग ओढवतात, असं नाही तर समाजातील विविध थरात अशा घटना घडल्याचे दिसून आलं आहे. या अर्जदार पिडितेचा भाऊ एका राष्ट्रीय पक्षाचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी आहे. त्यानं पक्ष पदाचा आसपासच्या सोसायटीतील नागरिकांना कष्ट देण्यासाठी केल्याचेही न्यायासनाच्या चौकटीत नोंद आहे. त्याचा सत्ता कवचामुळे महानगरपालिका, सदर बझार पोलीस ठाण्याच्या आवारात तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यात चौकातला 'नेता' म्हणून नेहमीचा वावर आहे, जो स्वतःकडे 'डॉन' म्हणून पाहतो. 

कोणत्याही दाखल गुन्ह्यात, त्या गुन्ह्याचे तपास अधिकारी त्यांच्या परीने तपासाचा भाग म्हणून अधिकाधिक खोलात जाऊन पुरावे खणून काढत असतात. 'सद् रक्षणाय, खल निग्रणाय' या ब्रीदाला साजेसे कर्तव्य ते पार पाडत असतात, या विनयभंग प्रकरणाच्या सत्यापर्यंत तपास अधिकारी जातीलच, एका महिलेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होईलच, न्यायासन न्याय करेलच, या व्यवस्थेवर संशयित आरोपीचा अढळ विश्वास असल्याचे त्या व्हिडिओत दिसते, अन् असावाही लागतो.  हे प्रकरण डिजिटल मीडियाशी संबंधित व्यक्ती, माहितीचा अधिकार कार्यकर्ता आणि राजकारण याशी निगडित असल्याने 'दूध का दूध, पाणी का पाणी' होईल, असंच आहे.