सोलापूर : शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन लोखंडी पाईपने पाठीवर जबर मारहाण करून तरुणाचा खून करण्यात आलाय. सुनिल नगरात गुंटुक कारखान्या पाठीमागील, अंकुश कोंडाबत्तीन यांचे घराचे बाजुला, मोकळया जागेत २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ०३ वा. च्या सुमारास घडलीय. राम ऊर्फ पापा राजु निंबाळकर (वय-३५ वर्षे) असं मृताचं नांव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शिवीगाळी केल्याच्या कारणावरून लक्ष्मण ऊर्फ अप्पी जाधव याने राम उर्फ पापा राजू निंबाळकर (रा. प्लॉट नं. १०, न्यु सुनिल नगर, एमआयडीसी, सोलापूर) याला गुंटुक कारखान्या पाठीमागील, अंकुश कोंडाबत्तीन यांचे घराचे बाजुला, मोकळया जागेत लोखंडी पाईप ने पाठीवर जबर मारल्याने त्याच्या पोटात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मृताचा भाऊ गणेश राजु निंबाळकर (रा. प्लॉट नं. १४७, कामाक्षी नगर, बोळकोटे नगरच्या आतील बाजुस, नविन विडी घरकुल रोड, सोलापूर) याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसांनी रविवारी 3 मार्च रोजी पहाटे पूर्वी लक्ष्मण उर्फ अवि जाधव यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केलाय. पोलीस निरीक्षक विजय खोमणे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.