सोलापूर : सीआरपीसी १०७ प्रमाणे चॅप्टर केसमध्ये मदत करण्यासाठी, केस लवकर संपविण्यासाठी तसेच वॉरन्ट न काढण्यासाठी पंढरपूर तहसील कार्यालय येथे खाजगी इसम भागवत जनार्धन बागल यांला १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलंय. त्याच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आलंय.
याबाबत मिळालेली थोडक्यात माहिती अशी की, पंढरपूर तहसील कार्यालयात खाजगी इसम भागवत जनार्धन बागल याने चॅप्टर केस मध्ये मदत करण्यासाठी तसेच वॉरंट न काढण्यासाठी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी तक्रारीची पडताळणी करून पंढरपूर तहसील कार्यालयात सापळा रचला होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे चे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील कारणासाठी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना खाजगी इसम भागवत जनार्दन बागल (रा. मु.पो. गादेगाव, ता. पंढरपूर) याला रंगेहात पकडण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी एका प्रसिद्धीपत्रकांमुळे सांगितले.
... आवाहन ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यांचेशी संपर्क करावा.
(गणेश कुंभार)
पोलीस उप अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो.
संपर्क पत्ता : पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, रंगभवन चौक, सोलापूर ४१३४०३.
संकेत स्थळ : acbmaharashtra.gov.in
acbmaharashtra.net
ई-मेल : dyspacbsolapur@gmail.com
ऑनलाईन तक्रार अॅप टोल फ्री क्रमांक : १०६४
दूरध्वनी क्रमांक : ०२१७-२३१२६६८