सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी आमदार विजय देशमुख यांच्यासमवेत वीरतपस्वी चेन्नविर शिवाचार्य महास्वामीच्या मठामध्ये विधीवत पूजा केली. यानंतर काशीपिठाचे जगद्गुरु विश्वआराध्य श्री श्री श्री 1008 डॉ. श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराजांनी सातपुते यांना विजयासाठी शुभेच्छा देत आशीर्वाद दिले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.