Type Here to Get Search Results !

गायक मोहंम्मद अयाज यांची उर्दू घर सांस्कृतिक समितीवर निवड


सोलापूर : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विभाग व जिल्हा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने सोलापूर चे ब्रंन्ड अम्बेसिडर व महाराष्ट्राचे महागायक विजेते मोह़म्मद अयाज यांची उर्दू घर समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. 

८ मार्च २०२४ रोजी सोलापूर उर्दू घर चे उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी सोलापूर उर्दू घर चे उपाध्यक्ष व प्रान्त अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या हस्ते मोहंम्मद अयाज यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सोलापूर च्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, जिल्हा पुरवठा चे सीमा होळकर, बांधकाम विभाग महानगर पालिका चे मुख्य कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, तहसीलदार उज्वला सोरटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी मोहंम्मद अयाज व गायत्री गायकवाड यांची शाम - एक - गझल तसेच सुखन मुशायरा चे आयोजन करण्यात आले होते. भरगच्च उर्दू सांस्कृतिक कार्यक्रमातून सोलापूर रसिकांना मेजवानी मिळाली. उर्दू घर चे अध्यक्ष जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद आणि समस्त जिल्हा प्रशासनाचे माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी दिली आहे, ती मी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार, असं मोहंम्मद अयाज यांनी यावेळी म्हटले.