उत्तर सोलापूर/कय्युम जमादार : छत्रपती परिवार मरवडे आयोजित २२ वा यंदाचा जिल्हास्तरीय कृतीनिष्ठ शिक्षक शैक्षणिक पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मार्डी येथील शिक्षिका डॉ. माधुरी भोसले यांना प्रदान करून नुकतंच सन्मानित करण्यात आले.
रविवारी, ०३ मार्च रोजी आप्पाश्री लॉन्स मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी सांस्कृतिक व क्रीडा मंडळ, परिवार मरवडे यांच्याकडून दिला जाणारा सन २०२३-२४ चा कृतीनिष्ठ शिक्षक पुरस्कार डॉ. माधुरी भोसले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मार्डी यांना आमदार समाधान अवताडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, शिक्षणाधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, समिती जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, अनिल कादे आदी मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
शिक्षणाधिकारी कादर शेख, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निम्बर्गी, विस्तार अधिकारी बापूराव जमादार, केंद्रप्रमुख निम्बर्गी, शाळा व्यवस्थापन समिती मार्डी, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी त्यांचं अभिनंदन केले.