Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी सोडून वंचित बहुजन आघाडीत उडी रमेश बारसकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फी

सोलापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीत लोकसभा उमेदवारीसाठी पक्षांतर करीत आहेत. मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश पातळीवरील पदाधिकारी रमेश बारस्कर यांनी वंचित बहुजन आघाडीत उडी घेतलीय. माढा लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारांच्या यादीत वंचित चा उमेदवार म्हणून रमेश बारस्करांचं नाव पुढे आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवक्ते महेश माने यांनी त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याचं सांगितलंय.

मोहोळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात रमेश बारस्कर क्रियाशील ओबीसी नेता म्हणून सर्वदूर ओळख आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी वंचित बहुजन आघाडीशी संधान बांधले, त्यात त्यांना यश मिळालं. ते होऊ घातलेल्या निवडणुकीत माढा लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणार आहेत.

त्यावर एका पत्राच्या माध्यमातून रमेश बारसकर यांची वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत माढा त्योकसभेसाठी उमेदवारी निशित झाल्याने व अतिकडच्या काळात छगन भुजबळ, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संपर्क असल्याने सोलापूर जिल्हाध्यक्ष  बळीराम काका साठे यांच्या आदेशानुसार रविवारी, ३१ मार्च रोजी त्यांना पक्षातून व पक्षाच्या पदावरून बडतर्फ करण्यात येत आहे. त्यांनी नियुक्त केलेल्या सर्व कार्यकारिणी देखील बरखास्त करण्यात येत आहे, याची सर्व प्रसार माध्यमं, मोहोळ तालुका तसेच जिल्ह्याच्या पदाधिकायांनी जिल्हा प्रवक्ते तथा कार्यालयीन सरचिटणीस महेश माने यांनी कळवलंय.