Type Here to Get Search Results !

... सोमवारची बैठक पुढं ढकलण्यात आलीय : दिलीप शिंदे



सोलापूर : भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींकडं सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघासाठी उमेदवारीची मागणी केली होती, मात्र त्यांना डावलल्यात आल्याची भावना शिंदे व त्यांच्या समर्थकांत आहे. यावर विचार विनीमय करून पुढील दिशा ठरविण्याची सोमवारी, ०१ एप्रिल रोजी शिंदे समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सुचनेनुसार ही महत्वपूर्ण बैठक पुढं ढकलण्यात आल्याचं इच्छुक उमेदवार दिलीप शिंदे यांनी सांगितलंय. 

२०१४ तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्ष जिंकला खरे, मात्र सोलापूर विकासाचा आलेख उंचावल्याचं निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना दिसलं नाही. त्यातच माजी खासदार डॉ. महास्वामी 'जाती' च्या दाखल्यामुळं नेहमीच वादात राहिले. 

ही दोन्ही नांवे घोषित झाली, त्यावेळी स्थानिक पातळीवरील त्यांचं पक्ष कार्य 'नाही' च्या बरोबर होते, तरीही पक्ष शिस्तीचा पाईक म्हणून गणला सामान्य  कार्यकर्ता पक्ष कार्याला लागला. यंदाच्या निवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार हा मुद्दा ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी महाजनांपुढंही व्यक्त केला होता. 

दिलीप दादाराव शिंदे गेल्या ३ दशकांपासून पक्ष कार्यात सक्रीय राहिले आहेत. सोलापूर शहर-जिल्हा, प्रदेश पातळीवरील तत्कालिन नेतृत्वामध्ये मागास वर्गातील पक्षाचा निष्ठावंत चेहरा अशी दिलीप शिंदेंची ओळख राहिली आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारीच्या नावाची घोषणा झाली. भाजप  उमेदवार देण्यासंदर्भात आठवडाभराने आमदार राम सातपुते यांचं नांव घोषित केले.

भारतीय जनता पार्टीकडे या लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूरच्या स्थानिक अनेक इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. यातील एकाही इच्छुक उमेदवाराला मुलाखतीला बोलावले नाही. जे-ते आपापल्या परीने मुंबई-दिल्लीच्या नेतृत्वांकडं प्रयत्नशील होते. काहींना आपल्या नावाचा विचार होईल, असंही सांगण्यात आलं. 

या इच्छुकांच्या मुलाखती नाहीत, चौकशी झाली नाही, त्यांना सातत्याने सांगण्यात आलं की, आपले नाव सर्व्हेतून येऊ द्या. एखाद्या मतदारसंघात उमेदवार कोण असावा, हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो. त्यांनी आमदार राम सातपुते यांचं नाव निश्चित केले. ते स्थानिक नसताना त्यांचे नाव सर्व्हेत कसे आले, असा प्रश्नचिन्ह स्थानिक उमेदवार असा आग्रह असणाऱ्या तसंच इच्छुकांना पडलाय.

ज्या ज्येष्ठांनी स्थानिक उमेदवार असावा, असा आग्रह महाजनांकडं धरला होता, त्यांचीही निराशा झालीय. बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवार म्हणून आ. राम सातपुते यांच्याकडं पाहणाऱ्यांच्या खदखदता असंतोष व्यक्त करण्यासाठी तसंच पुढील दिशा ठरविण्यासाठी सोमवारी, ०१ एप्रिल रोजी शिंदे समर्थकांनी एका बैठकीचं आयोजन  केलं होतं, या बैठकीत भाजपच्या उमेदवारीवर मंथन अपेक्षित होतं. या पुढील भूमिकेसंबंधी निर्णय याबाबत चर्चा होणार होती, मात्र ही बैठक भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांच्या सुचनेनुसार पुढे ढकलण्यात आलीय, असे दिलीप शिंदे यांनी आपल्या समर्थकांना कळविलं आहे.