(प्रतिकात्मक छायाचित्र)
सोलापूर : कोणीतरी अज्ञातानं अल्पवयीन मुलाचं फूस लावून अपहरण केलंय. ही खळबळजनक घटना बुधवारी, २७ मार्च रोजी रात्री घडलीय. त्याचा सर्वत्र शोध घेऊन तो मिळून न आल्याने त्याच्या पालकांनी जेलरोड पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल केलीय. तो भारती विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचेही सांगण्यात आलंय.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, येथील बेगम पेठेतील रहिवासी, व्यवसायाने भाजी विक्रेते असलेले इरफान उस्मान गनी बागवान (वय - ४९ वर्षे) यांचा मुलगा आयान (वय-१७ वर्षे ०९ महिने) हा विजापूर रस्त्यावरील भारती विद्यापीठात इयत्ता बारावी शिक्षण घेत आहे. बुधवारी, २७ मार्च रोजी रात्री अज्ञाताने कशाची तरी फुस लावून त्याच्या राहत्या घरापासून अपहरण केलंय. त्याचे पालक इरफान बागवान यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केलीय.
अपहृत मुलगा आयान याची उंची- ०४ फुट ६,रंग सावळा, बांधा मध्यम, भाषा-हिन्दी आणि अंगावर नेसणेस पांढरा रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट असे त्याचे वर्णन आहे. याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. सहाय्यक फौजदार झेड. एन. काझी या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत