Type Here to Get Search Results !

रोटरी एमआयडीसी-उद्योग बँक व्याख्यानमाला आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर


ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड

सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी व उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श पत्रकार पुरस्कार-२०२४ ची घोषणा मंगळवारी सकाळी करण्यात आलीय. या पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी, १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अक्कलकोट रस्ता, एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळील टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन च्या सभागृहात होत आहे. ज्येष्ठ पत्रकार दैनिक 'सांज' चे अविनाश कुलकर्णी यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय.

आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी सौ. अश्विनी तडवळकर (दिव्य मराठी), यशवंत सादुल (लोकमत), वैभव गाढवे (सकाळ), नागराज बगले (संचार) संगमेश जेऊरे (माजी उपसंपादक, तरुण भारत), सागर सुरवसे (TV9 मराठी), मनोज हुलसरे (इन सोलापूर, न्युज चॅनल) यांची निवड करण्यात आली तर दैनिक सांजचे कार्यकारी संपादक अविनाश कुलकर्णी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार हरीश केंची, पुणे यांचा हस्ते पुरस्काररांचं वितरण होणार असल्याचे रो. नवनाथ इंदापुरे यांनी म्हटलंय.

या कार्यक्रमासाठी आपण बहुसंख्येने उपस्थित रहावं, असं आवाहन उद्योग बँक आणि रोटरी एमआयडीसी व्याख्यानमाला अध्यक्ष रो. नवनाथ इंदापूरे यांनी केलं आहे.