Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका जयंती उत्सव अध्यक्षपदी पद्मावती इंगळे तर सचिवपदी अमोल सावंत


सोलापूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची  १३३ व्या जयंतीनिमित्त पदाधिकाऱ्यांची निवड व नियोजन करण्यासाठी इंद्रभवन परिसरात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका जयंती उत्सव अध्यक्षपदी पद्मावती इंगळे तर सचिवपदी अमोल सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली.

प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं, यानंतर बैठकीला प्रारंभ झाला. यावेळी सन २०२३-२४ साला मधील जमाखर्चाविषयी चर्चा झाली, त्यानंतर नूतन  अध्यक्षपदी आरोग्य निरीक्षका,पद्मावती इंगळे ,यांची एकमताने निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्य निरीक्षक पवन वाघमारे होते.


या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी अजय कांबळे, किशोर कांबळे, कार्याध्यक्षपदी उमेश गायकवाड, सतीश नागटिळक, खजिनदारपदी शुभम रणखांबे, सहखजिनदारपदी अजय जाधव, सहसचिवपदी परवेज शेख, प्रसिद्धी प्रमुखपदी रवि बनसोडे, सल्लागार पदी शेषराव शिरसट, उत्तम कसबे, सुनील भालेराव, उमेश गायकवाड, भिमा सिताफळे, रजनीकांत बाळशंकर, विकी पात्रे, अनिल जगझाप, शंकर आखाडे, शितल बनसोडे, पप्पु सातपुते, श्रीकांत भंडारे, आनंद गायकवाड, सुजित काळे, रमेश वाघमारे, सुधाकर कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी आरोग्य निरीक्षक, संस्थापक अध्यक्ष शेषराव शिरसट आणि उत्तम कसबे यांनी पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या.