पोषण आहार धान्याचा अपहार करून विक्रीचा प्रयत्न मुख्याध्यापिका व संस्थाध्यक्षांवर करा गुन्हा दाखल : छावा

shivrajya patra

सोलापूर : विडी घरकुलातील राजश्री शाहू प्रशाला या शाळेत प्राथमिक विद्यार्थ्यासाठी पोषण आहारासाठी शासनाकडून येणारे धान्याचा अपहार करून ते धान्य खुल्या बाजारात विक्री केले जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. पोलिसांनी या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय छावाचे योगेश पवार यांनी पोलीस आयुक्तांकडं केलीय.

मराठा समाज सेवा मंडळाचे संचलित राजश्री शाहू प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून आलेले पोषण आहार धान्य विद्यार्थ्यांच्या मुखात घालण्याऐवजी त्याचा अपहार करून त्याची काळ्या बाजाराने विक्री करून विद्यार्थ्यांचे तोंड मारण्याचा प्रकार होत असल्याचा निंदनीय प्रकार ०२ मार्च रोजी उघडकीस आलाय.

पोषण आहार धान्यातील जवळपास ०६ क्विंटल तांदूळ, साखर, तेल पाकीट असे धान्य शाळेतून अॅपे (टमटम) गाडी नंबर MH 13 CT 8617 या वाहनचालकाच्या वाहनात भरून दिले. हा प्रकार एका पत्रकारांच्या जागरुकतेमुळे चव्हाट्यावर आलाय. त्या चालकाकडे कसून चौकशी करता, मुख्याध्यापिकेला रोख १७ हजार रुपये देऊन माल वाहनात भरल्याचे सांगितलंय. तो माल  यांनी गाडी चालकामार्फत कलबुरगी नावाच्या दलालास  देण्यासाठी बाहेर काढून दिल्याचे सांगितलंय.

त्या पत्रकारानं ती गाडी अडवून त्याचा व्हिडिओ काढून कसून चौकशी करता खळबळजनक माहिती पुढं आलीय. ती पत्रकारानं ते वाहन MIDC पोलीस स्टेशन येथे जमा केले. पत्रकार व पोलिसांना लाच देतोय, असे दाखवून संस्थेच्या अध्यक्षानं एसीबीमार्फत ट्रपचा प्रयत्न चालविला. परंतु पोलीस, पत्रकार हे गुन्हा दाखल करण्यावर ठाम असल्यामुळे त्यांचा प्लॅन फसलाय, असं छावा संघटनेनं आपल्या निवेदनात म्हटलंय.

राजकीय पटलावर कधी काळी 'पंत' अशी बिरुदावली लावून समाजात वावरणारं नेतृत्व आपलं राजकीय 'वजन ' खर्ची टाकून अन्न धान्य वितरण अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना मॅनेज करून या प्रकरणातून सुटण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप छावा च्या योगेश पवार यांनी केलाय. 

शासनाने भावी पिढी सक्षम व्हावी, या उदात्त हेतून शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित केलीय, खरे मात्र राजश्री शाहूंच्या नावावर शाळा चालून विद्यार्थ्यांना घास भरविण्याऐवजी तो घास गिळंकृत करू पाहणाऱ्या मुख्याध्यापिका सोलापुरे आणि अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्याची अथवा खाजगी फिर्याद दाखल करण्यासाठी सीआरपीसीचे कलम १९७ अन्वये परवानगी द्यावी, अशी मागणी योगेश पवार यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व शिक्षणाधिकारी यांच्याकडे केलीय.


To Top