धार्मिक अल्पसंख्याक बहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान अर्ज करावेत 'या' तारखेपर्यंत

shivrajya patra

सोलापूर : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे बहुल असलेल्या जिल्ह्यातील शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत सोयी- सुविधा उपलब्ध करुण देण्यासाठी तसेच शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी शासनमान्य शाळांना अनुदानासाठी पात्र असलेल्या संस्थानी १२  मार्चपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी केलंय.

जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित,कायम विना अनुदानित शाळा, अपंग शाळा, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव १२ मार्च २०२४ पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सादर करण्याचे आवाहनही जिल्हा नियोजन अधिकारी पवार यांनी केलं आहे.  

To Top