सोलापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या सर्व योजना त्याची माहिती पोहोचवून लाभार्थींना कुठल्या योजनेचा लाभ मिळाला, त्या योजनेचे नाव, मोबाईल नंबर, बुथ क्र, पत्ता आपण नोंद करून सरल अॅप च्या माध्यमातून अपडेट करण्यात यावे, त्याचबरोबर नविन मतदारांपर्यत पोहोचून मोदी यांचे कार्य त्यांच्या पर्यंत घेऊन जावं, अशी माहिती शहर अध्यक्ष नरेंद्र काळे व लाभार्थी संपर्क अभियानाचे सोलापूर शहर संयोजक आनंद गोसकी यांनी पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात विविध शासकीय योजनांचे लाभ घेतलेल्या लाभार्थांना संपर्क साधून लाभार्थी संपर्क अभियान, अंतर्गत मोदी यांना जोडण्यासाठी सर्व पदाधिकारी मंडल संयोजक, सहसंयोजक आपल्या लाभार्थी संपर्क अभियान संयोजक, सहसंयोजक, मंडल संयोजक, सहसंयोजक, बूथ संयोजक, सुपर वॉरियर्स यांनी बुथ प्रमुखांकडून प्रत्येक बुथवर जाऊन भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरच्या वतीने लाभार्थी संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.
यावेळी उपस्थित शहर सहसंयोजक आनंद बिर्रू,अनिल मामा कंदलगी, कोंडी मेंबर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शिवानंद पाटील, सतिश महाले व सर्व पदाधिकारी सुपर वारीयर्स उपस्थित होते.

