Type Here to Get Search Results !

समाजाच्या विकासासाठी करावेत अविरत प्रयत्न : वेदमूर्ती महांतेश हिरेमठ


जागतिक लिंगायत महासभा तालुकाध्यक्षपदी अमोल म्हमाणे

मंगळवेढा : समाज संघटित होऊन समाजाचा विकास साधला पाहिजे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन संघटनेने समाजाचं काम करावं, त्यांना न्याय मिळवून द्यावा, त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी अविरत प्रयत्न करावेत, असं प्रतिपादन वेदमूर्ती महांतेश हिरेमठ यांनी केले.   

जागतिक लिंगायत महासभा मंगळवेढा याची तालुका कार्यकारिणी खालील सहपत्रित यादी  प्रदेशाध्यक्ष राजशेखर तंबाके, कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे व जिल्हाध्यक्ष शिवानंद  गोगांव यांच्या मान्यतेने मंगळवेढा तालुका अध्यक्ष अमोल म्हमाणे यांची निवड जाहीर करण्यात आलीय. यावेळी वेदमूर्ती महांतेश हिरेमठ बोलत होते. 

मौजे बोराळे या ठिकाणीच्या कार्यक्रमात परम पूज्य वेदमूर्ती महांतेश हिरेमठ त्यांच्या शुभहस्ते सर्व तालुका पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना हत्तुरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अॅड. दत्तात्रय तोडकरी, बाबुराव पाटील, मंगळवेढा तालुका अध्यक्ष अमोल म्हमाणे, संजीव कवचाळे, संगमेश्वर चौगुले, गजानन पाटील, अतुल माळी, पद्माकर बनसोडे, गुरुदेव कोरे, आकाश राजमाने, मोहन पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 


तालुका कार्यकारिणीत ▶️तालुका उपाध्यक्षपदावर ७ जणांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यात संतोष सोनगे (सिद्धापूर), सुरेश पाटील (नंदुर), देविदास कुंभार (गुंजेगाव), सिद्धेश्वर पाटील (येड्राव), धनंजय पाटील (लक्ष्मी दहीवडी), संगमेश्वर चौगुले (हन्नूर) आणि अतुल माळी (नंदुर) यांचा समावेश आहे. ▶️कोषाध्यक्ष : पद्माकर बनसोडे (बोराळे), ▶️सेक्रेटरीपदी : महेश पाटील (बोराळे), गुरुदेव कोरे (हन्नूर), चंद्रकांत पाटील (सलगर), आकाश राजमाने (अरळी), ▶️प्रसिद्धी प्रमुखपदी मल्लिकार्जुन देशेट्टी (ब्रम्हपुरी), मोहन पाटील (लक्ष्मी दहीवडी) तर ▶️कार्यकारणी सदस्य : रामलिंग पाटील (खडकी), अप्पासाहेब पाटील (धर्मगाव), विश्वनाथ पाटील (मुंढेवाडी), रमेश पाटील (सिद्धनकेरी), अरविंद पाटील (उचेठाण), दत्तात्रय साबणे (नंदेश्वर), अरविंद चौगुले (आरळी), रोहित पाटील (खवे), संकेत पाटील (येड्राव), विनायक लंगोटे (बोराळे), प्रकाश कोरे (बोराळे), विजय कवचाळे (तळसंगी), शुभम खडके (धर्मगाव), शिवशंकर बिराजदार (सोड्डी), सिद्धराया बिराजदार (सोड्डी), महालिंग पावले (सलगर), प्रदीप पाटील, सागर रामचंद्र कोष्टी, विश्वनाथ बसवंत लंगोटे आणि महांतेश बसवंत पाटील आदींसह जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आलीय. 

▶️सल्लागार मंडळात दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील (तळसंगी), ज्येष्ठ नेते, माजी सभापती, भीमराव पाटील, डॉ. चनवीर कवचाळे (बोराळे), गौरीशंकर बुरुकुल (मंगळवेढा शहर), अॅड. दत्तात्रय तोडकरी (लक्ष्मी दहीवडी) आणि तुकाराम कुदळे (मंगळवेढा शहर) या ज्येष्ठांचा समावेश आहे. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.