रेहान उर्फ रियाज मकानदार तडीपार

shivrajya patra

सोलापूर : सामान्य नागरीकांना दमदाटी, त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे काढून घेणे, नागरीकांना शिवीगाळी, दमदाटी व मारहाण करुन दुखापत करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या रेहान उर्फ रियाज शाहजहान मकानदार (वय-२७ वर्षे) याला पोलीस आयुक्तालय हद्द उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.

अक्कलकोट रस्त्यावरील समाधान नगर येथील रहिवासी रेहान उर्फ रियाज शाहजहान मकानदार याचेविरुध्द सन २०२२ ते २०२३ या कालावधीमध्ये आणि गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र.६८६/२०२४ अन्वये, रेहान उर्फ रियाज मकानदार यास सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता दि.१६ मार्च २०२४ पासून तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर होर्ती पोलीस ठाणे, विजयपूर, कर्नाटक येथे सोडण्यात आले आहे. 

To Top