सोलापूर : पत्रकार बंधूनी समाजातील समस्या निर्भीडपणे मांडून जनतेला न्याय मिळवून द्यावा, तसेच दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासात आपल्या लेखणीच्या माध्यमातून योगदान द्यावं,असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेचे नूतन अध्यक्ष पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांच्यासह सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आमदार देशमुख बोलत होते. यावेळी त्यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार नारायण चव्हाण, राजकुमार सारोळे, अमोगसिध्द लांडगे,प्रशांत कटारे, उपाध्यक्ष महासिद्ध साळवे, सचिव नितीन वारे, कार्याध्यक्ष शिवराज मुगळे, कोषाध्यक्ष-दिनकर नारायणकर, प्रसिध्दी प्रमुख - बबलू शेख,संघटक-आनंद बिराजदार, सहसचिव-अप्पू देशमुख व अशोक सोनकंटले, कार्यकारिणी सदस्य गजानन काळे, बालाजी वाघे, शिवय्या स्वामी, प्रमोद जवळकोटे, बिरु रूपनुरे, कलय्या स्वामी, संगय्या स्वामी, आरिफ नदाफ, महेश पवार, बनसिद्ध देशमुख, अभिजीत जवळकोटे आदी उपस्थित होते.