सोलापूर : शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांच्या सतत प्रयत्नामुळे शारीरिक शिक्षण शिक्षकास न्याय मिळाला आहे. चालू सेवक संचामध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक नेमण्यास मान्यता मिळाली, त्याबद्दल सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी सर्व संघटनेचे पदाधिकारी, क्रीडाशिक्षक यांनी पेढे भरवून अभिनंदन व आनंदोत्सव साजरा केला.
मागील सेवक संचामध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकाचे पद नसल्याचे दिसत होते. त्यामुळे नवीन शारीरिक शिक्षण शिक्षक नेमण्यास अडचणी निर्माण होत होत्या. यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांच्या सतत प्रयत्नामुळे शारीरिक शिक्षण शिक्षकास न्याय मिळाला आहे.
याप्रसंगी सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण महासंघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, दक्षिण तालुकाध्यक्ष वीरेश थळंगे, शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार, शहर सचिव प्रा. प्रमोद चुंगे, प्रा.राहुल हजारे, वीरेश अंगडी, संतोष जाधव, सचिन गाडेकर, डॉ. उज्वल मलजी, प्रा. ज्ञानेश्वर काळे, सुखदेव गुरव, संतोष पाटील, शिरीष गुरव, मारुती घोडके, दत्तात्रय मेरगू, सतीश भोसले, सुभाष उपासे, प्रसिद्धी प्रमुख शिवानंद सुतार, संतोष कस्तुरे, सारंग पाटील, विजय लांडगे, सनी भोसले, अक्षय गवळी, शितल शिंदे, पवन भोसले यांच्यासह क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.