कोल्हापूरमधून गादीचे वारस वर्तमान शाहू महाराजांच्या उमेदवारीचं समर्थन : वामन मेश्राम
लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरु झाला आहे. छत्रपती शाहू महाराजांचे व बाबासाहेबांचे स्नेहसंबंध लक्षात घेता, कोल्हापूरमधून शाहू महाराजांच्या गादीचे वारस वर्तमान शाहू महाराजांच्या उमेदवारीचे आम्ही समर्थन करत आहोत, अशी भूमिका बहुजन मुक्ती पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष वामम मेश्राम यांची असून होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे करणार असल्याचंही ट्विटर हँडलवर म्हटलंय.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी, खासदार सुप्रिया सुळे यांनाही आम्ही बारामती लोकसभा मतदार संघात व्यक्तिगत पातळीवर समर्थन करत आहोत, अशी स्पष्ट भूमिका मांडलीय.
महाविकास आघाडी, 'संविधान धोक्यात आहे', असे वांरवार सांगून अनुसूचित जाती-जनजाती, भटक्या-विमुक्त जाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे मनात भय निर्माण करून त्यांचा केवळ मतांसाठी वापर करत आहे व त्यांच्या खऱ्या नेतृत्वाला राजकीय प्रतिनिधीत्व मिळू नये, यासाठी प्रयत्नशील आहे, हे स्पष्ट दिसत आहे.
त्याच्या निषेधार्थ आम्ही महाराष्ट्रातील बहुतेक लोकसभा मतदार संघात उमेदवार उभे करत आहोत, तर काही मतदार संघात वंचित आघाडीच्या व अपक्ष उमेदवारांना परिस्थिती अनुरूप समर्थन देण्याचा निर्णय घेत आहोत, असंही वामन मेश्राम यांनी लिहिलं आहे.