Type Here to Get Search Results !

महर्षी वाल्मिकी संघाच्या मागणीनंतर पुरातत्व खात्याचे अधिकारी पंढरीत दाखल !


मागणीनुसार सर्व कामे सुरु असल्याची अधिकार्‍यांची ग्वाही : गणेश अंकुशराव

पंढरपूर : पंढरपुरात सध्या सुरु असलेल्या मंदिर श्रीविठ्ठल मंदिर जतन व संवर्धनाचे काम पाहण्यासाठी पुरातत्व खात्याचे अधिकारी पंढरीत दाखल झालेत, त्यांच्या देखरेखीखाली आता हे काम सुरु असून काम सुरु असताना आढळुन आलेल्या कांंही पुरातन ऐतिहासिक वस्तु व शिलालेखांचा पुरातत्व खात्याकडून अभ्यास सुरु आहे. याबबतची मागणी पंढरपुरातील सामाजिक संघटना महर्षी वाल्मिकी संघाकडून करण्यात आली होती.

 पंढरपुरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बाजीराव पडसाळी भागात कांही दगडी रांजणसदृश्य वस्तू आणि मंदिरातील सर्वच फरशीखाली अनेक शिलालेख आढळून आले. यानंतर पंढरपुरातील सामाजिक संघटना महर्षी वाल्मिकी संघाकडून सदर पाडकाम व खोदकाम हे पुरातत्व अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली करावे, तसेच पुरातत्व खात्याने आढळून आलेल्या रांजणसदृश्य वस्तूंसह शिलालेखांचा अभ्यास करुन या सर्व शिलालेखांवर कोणत्या लिपीत आणि काय लिहिलेले आहे, याचा अभ्यास करुन पुरातत्व खात्याने शोध लावण्याची मागणी केली. यानंतर श्रीविठ्ठल मंदिरात पुरातत्व खात्याचे अधिकारी आले असुन येथील आढळून आलेल्या सर्व ऐतिहासिक वस्तुंची व शिलालेखांची पाहणी केली.

 श्रीविठ्ठल मंदिर सुरु असलेल्या सर्व कामाचे निरीक्षण पुरातत्व खात्याने बारकाईने करावे, येथे कांही देवतांच्या मुर्तीखाली महादेवाच्या पिंडी सदृश्य आकारमान सुध्दा आढळुन येत असुन यासंदर्भातही अभ्यास करावा तसेच या अभ्यासाअंती माहित नसलेला इतिहास उजेडात येतोय का? याचा शोध लावुन पंढरीची पुरातन महती जगासमोर मांडावी, अशी मागणी यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली असून यासह विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी पुरातत्व खात्याचे अधिकारी डॉ. विलास वाहणे व मंदिर समितीला दिले. यावेळी पुरातत्व खात्याची सर्व टीम उपस्थित होती.


आपल्या मागणीनुसार पंढरपुरच्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिराला फार मोठा पुरातन इतिहास आहे, मंदिरात मागील काळात नवीन बांधकाम झाले असताना अनेक पुरातन वस्तु, आणि ऐतिहासिक खाणाखुणा जमिनीत गाडल्या गेल्याची शक्यता नाकारता येत नाही, 

आज मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या निमित्ताने कांही ऐतिहासिक खाणाखुणा व वस्तु दृष्टीस पडल्या असून याचा पुरातत्व खात्याकडून सखोल अभ्यास करु, येथे सुरु असलेली सध्याची सर्व कामे ही कॅमेर्‍यासमोर सुरु असून आपल्या मागण्यांचा योग्य विचार करु, अशी ग्वाही पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांनी यावेळी दिली असल्याची माहिती गणेश अंकुशराव यांनी दिली. 

यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, माऊली कोळी, प्रकाश मगर, अश्‍विन बुरले, समाधान कोळी, भैया गाडे, बबलु आसबे, अप्पा करकमकर, यश अंकुशराव, वाल्मिकी अंकुशराव आदी उपस्थित होते.