Type Here to Get Search Results !

नूतन परीक्षा संचालकपदी डॉ. श्रीकांत अंधारे रुजू !

 

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी डॉ. श्रीकांत अंधारे यांची निवड झाली असून त्यांनी बुधवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. 

कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी नूतन परीक्षा संचालक डॉ. अंधारे यांचे यावेळी स्वागत केले. प्रभारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. मलिक रोकडे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांनीही डॉ. अंधारे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, उपकुलसचिव डॉ. उमराव मेटकरी, सहायक कुलसचिव आनंद पवार, अरविंद कोळेकर आदी उपस्थित होते.

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिव या पदावर डॉ. अंधारे हे कार्यरत होते. विद्यापीठाच्या विविध विभागात आणि प्राधिकरणावर डॉ. अंधारे यांनी काम केले असून त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने परीक्षा विभागात चांगले काम करू, असा मनोदय डॉ. अंधारे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.