सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार गुलदस्त्यात
माढ्यात पुनःश्च खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील २० लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केलीय. त्याचवेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गुलदस्त्यात ठेवत माढा लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर यांना पुनःश्च संधी देण्यात आलीय तर बीड मतदारसंघात श्रीमती पंकजा मुंडे यांना भाजपाने संधी दिलीय.
०१ नंदुरबार- (एस.टी) डॉ. हिना विजयकुमार गावित, ०२ धुळे- डॉ. सुभाष रामराव भामरे, ०३ जळगाव- श्रीमती स्मिता वाघ, ०४ रावेर-श्रीमती रक्षा निखिल खडसे, ०६ अकोला- अनुप धोत्रे, ०८ वर्धा- रामदास चंद्रभानजी तडस, १० नागपूर- नितीन जयराम गडकरी, १३ चंद्रपूर- सुधीर मुनगुंटीवार, १६ नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर, १८ जालना- रावसाहेब दादाराव दानवे, २० दिंडोरी (एस.टी.) डॉ. भारती प्रवीण पवार, २३ भिवंडी- कपिल मोरेश्वर पाटील, २६ मुंबई (उत्तर)- पियुष गोयल, २८ मुंबई (उत्तर-पूर्व) मिहीर कोटेचा, ३४ पुणे- मुरलीधर किशन मोहोळ, ३७ अहमदनगर- डॉ. सुजय राधाकृष्ण विखे-पाटील, ३९ बीड लोकसभा मतदारसंघात श्रीमती पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आलीय.
४१ लातूर (एस.सी.)- सुधाकर तुकाराम शृंगारे, ४३ माढा- रणजीत सिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर आणि ४४ सांगली लोकसभा मतदार संघासाठी संजय पाटील यांचं नांव घोषित करण्यात आलंय. याशिवाय तेलंगणा राज्यातील आदिलाबाद (एस.टी.) पेद्दापल्ले (एस. सी.) मेडक, महबूबनगर, नलगोंडा, महबूबाबाद (एस.टी.) आणि त्रिपुरा राज्यातील त्रिपुरा-पूर्व (एस.टी.)या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा बुधवारी करण्यात आलीय.