सोलापूर : आई आजारी असल्याने राहते घरातून २ मुलींसह माहेरी गेलेली विवाहिता माहेरी न पोहोचल्याची धक्कादायक घटना घडलीय. हा प्रकार बापूजी नगरातील स्लॅटर हाऊस येथे घडल्याची नोंद सदर बझार पोलीस ठाण्यात करण्यात आलीय. सौ. अनिता जमलप्पा जंगम (वय-२५ वर्षे) असं त्या बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की बापूजी नगर स्लॅटर हाऊस येथील रहिवासी सौ. अनिता जंगम हिची आई आजारी असल्याने ०२ जानेवारी 2024 रोजी ०८ वर्षीय कु. लावण्या आणि कु. रागिणी (वय - ०१वर्षे) या मुलींना सोबत घेऊन माहेरी औरंगाबाद येथे निघून गेली होती.
ती औरंगाबाद येथे पोहोचली का यासंबंधी जमलप्पा जंगम यांनी स्वतः औरंगाबाद येथे जाऊन पाहणी केली असता, पत्नी सौ. अनिता व २ लहान मुली तेथे न पोहोचल्याचे दिसून आले. त्या तिघांचा इतरत्र शोध घेतला मात्र त्या अध्याप पर्यंत मिळून आल्या नाहीत.
याप्रकरणी जमलप्पा जंगम यांनी त्या तिघी बेपत्ता झाल्याची तक्रार सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केली. सौ. अनिताची उंची पाच फूट, शरीरयष्टीने मजबूत बोलीभाषा तेलुगु आणि अंगावर नेसणेस काळ्या रंगाची साडी असं वर्णन आहे. त्या कोठे आढळल्यास सदर बझार पोलीस ठाण्याचे पोहेकॉ/ ४२१ एम. सी. इनामदार यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आले आहे.