Type Here to Get Search Results !

रहदारीस अडथळा होईल अशा निवडणूक साहित्य-बॅनर लावण्यावर निर्बंध


सोलापूर :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम 16 मार्च 2024 रोजी घोषित झाला असून,  आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी अथवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणूक संबंधी साहित्य रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1) (डीबी) अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आर्शीवाद यांनी निर्बंध आदेश जारी केले आहेत.

जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी अथवा  त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणूकी संबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्डींग्ज, कमानी लावणे या व इतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (०६ जून २०२४ पर्यंत) निर्बंध राहिल.