सोलापूर : पद्मसूर्य प्रतिष्ठान आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त गुरूवारी, ७ मार्च रोजी 'आगळी-वेगळी' स्पर्धा घेतली. विडी वळण्याच्या भव्य स्पर्धेत विडी व्यवसायातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना, जागतिक महिला दिनी, शुक्रवारी ८ मार्च रोजी कामगार सेनेचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी, सौ. रेखा आडकी, तसेच पद्मसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक विजय निली यांच्या हस्ते बक्षीसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास उपस्थित पदाधिकारी नागराज वंगा, श्रीनिवास पेंटा, गणेश गोरंटला, प्रशांत जक्का, नरेश पुट्टा, जगदीश बत्तीन , माऊली पोला आदी अधिकारी उपस्थित होते.