Type Here to Get Search Results !

पत्रकार मारुती बावडे यांचा रविवारी अक्कलकोट भूषण पुरस्काराने गौरव; अनेक मान्यवरांची उपस्थिती


अक्कलकोट : येथील पत्रकार मारुती बावडे यांना नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ग्रामीण पत्रकारितेतील पुरस्कार मिळाल्याबद्दल समस्त अक्कलकोट तालुक्यातील जनतेच्यावतीने त्यांचा अक्कलकोट भूषण पुरस्कार व मानपत्र देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष दिलीप सिद्धे व कार्याध्यक्ष सुधीर माळशेट्टी यांनी दिली. 

हा गौरव सोहळा रविवारी, १७ मार्च रोजी दुपारी १२.३० वा. मंगरुळे फंक्शन हॉल, कांदा बाजार येथे होणार आहे.  पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते पत्रकार मारूती बावडे यांना अक्कलकोट भूषण पुरस्कार व मानपत्र देण्यात येणार आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली नागरी सत्कार सोहळा पार पडणार आहे, असं नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी सांगितलं.

पत्रकार मारुती बावडे यांना आतापर्यंत चांगल्या कार्यामुळे जिल्हास्तर तसेच राज्यस्तरीय विविध पुरस्कार मिळाले आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून गेल्या २३ वर्षात त्यांनी सर्व समावेशक, निःपक्षपातीपणे विकासात्मक लेखन करून तालुक्याच्या विकासात बहुमोल असं योगदान दिल्याबद्दल हा गौरव तालुक्याच्यावतीने आम्ही करीत आहोत, असं सिद्धे यांनी सांगितले.

बावडे यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरून घेतली गेल्याने अक्कलकोटचा सन्मान वाढला असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे यांनी सांगितलं तर बावडे यांच्या पत्रकारितेतून दीन-दलित,गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाल्याने व पहिल्यांदाच तालुक्याला त्यांच्या रूपाने असा मोठा बहुमान मिळाल्याने आनंद झाला आहे, असं माळशेट्टी यांनी सांगितले.

या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष संजय देशमुख, मार्गदर्शक अॅड. शरद फुटाणे, ज्येष्ठ नेते अश्पाक बळोरगी, मल्लिकार्जुन पाटील, उमेश पाटील यांनी केलं आहे.

यावेळी उपाध्यक्ष लाला राठोड,महिबुब मुल्ला,एजाज मुतवल्ली,सचिव जितेंद्रकुमार जाजू, मार्गदर्शक बसलिंगप्पा खेडगी, सुनील बंडगर, अविनाश मडीखांबे, मोहन चव्हाण आदी उपस्थित होते.

....... यांची असणार प्रमुख उपस्थिती .......

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे,ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी (मुंबई), श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुष्पराज काडादी, गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे, जय हिंद शुगरचे चेअरमन गणेश माने, सोलापूर आकाशवाणीचे केंद्रप्रमुख सुजित बनसोडे, श्री वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय.

...... यांचाही होतोय सत्कार ......

या कार्यक्रमात तालुक्यातील जेष्ठ पत्रकार बाबा निंबाळकर (लोकसत्ता), स्वामीनाथ हरवाळकर ( पब्लिक न्यूज १८),अरुण जाधव (अक्कलकोट प्रभात), शिवानंद फुलारी(लोकमत),प्रशांत भगरे (संचार), अरविंद पाटील(पुण्य नगरी), सैदप्पा इंगळे (दिव्य मराठी), चेतन जाधव ( सकाळ), सोमशेखर जमशेट्टी (संयुक्त कर्नाटक), योगेश कबाडे (दिव्य मराठी), नंदकुमार जगदाळे (सामना), प्रवीण देशमुख (अक्कलकोट समर्थ), वीरपाक्ष कुंभार (संचार),शंभुलिंग अकतनाळ (लोकमत), बसवराज बिराजदार (तरुण भारत), शिवा याळवार (पुढारी), रविकांत धनशेट्टी (सुराज्य), स्वामीराव गायकवाड(रयत संवाद), महेश गायकवाड (प्रीती संगम), राजेश जगताप (जनमत), रमेश भंडारी (दामाजी एक्स्प्रेस), दयानंद धणुरे (तरुण भारत संवाद), यशवंत पाटील (पुढारी), अभिजीत पत्की (तरुण भारत संवाद), गणेश भालेराव (अक्कलकोट सिटी) यांचाही सत्कार होणार असल्याची माहिती नागरी समितीने दिलीय.