संगीतकार आनंदजींशी मोहंम्मद अयाज यांची सदिच्छा भेट

shivrajya patra

मुंबई : ज्येष्ठ संगीतकार  कल्याणजी आनंदजी संगीत क्षेत्रात अनेक दशके ज्यांनी अधिराज्य गाजवले. या जोडीतील आनंदजी यांच्या ९१ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोलापूरचे गायक मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. 

मोहम्मद अयाज जेव्हा महाराष्ट्राचे महागायक विजेते झाले तेव्हा संगीतकार आंनदजीकडून भरभरून कौतुक केलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून आजतागायत अयाज यांनी एक पिता-पुत्राप्रमाणे हे नाते जोपासले. 



आपल्या संगीतानं वेड संपूर्ण जगाला लावणारे संगीतकार आनंदजी २ मार्च रोजी ९१ वर्षाचे झालेत. त्यांना दिर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणी असेच भारतीय संगीताचा एक कोहिनूर हिरा म्हणून आपण चमकत रहावं एवढीच अपेक्षा करतो.यावेळी मोहम्मद अयाज यांच्यासह आनंदजींचा परिवार उपस्थित होता.


छायाचित्र : ज्येष्ठ संगीतकार आनंदजी व गायक मोहम्मद अयाज


To Top