Type Here to Get Search Results !

अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासकडून भक्तांना विविध सोयी-सुविधा देण्यावर भर : अभिनेते अर्जुन-फिरोज खान




अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासकडून भक्तांच्या विविध सोयी-सुविधा देण्यावर भर देत असल्याचे मनोगत महाभारत फेम व कन्नड-हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अर्जुन-फिरोज खान यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात आले असता, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत महादेव चिंचोळकर, देवा चिंचोळकर हे उपस्थित होते.

याप्रसंगी न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, शहाजीबापू यादव, सतिश महिंद्रकर, नामा भोसले, चंद्रकांत हिबारे, अतिष पवार, अंकुश चौगुले, शावरेप्पा माणकोजी, मल्लिकार्जुन कोगणुरे, कल्याण देशमुख, दत्ता माने, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.