Type Here to Get Search Results !

... खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर यश मिळवून गावाचे नाव करावं उज्वल : संचालक सुरेश हसापुरे


मंद्रुप :  येथील न्यू गोल्डन क्लबने गेल्या पंधरा वर्षांपासून मंद्रूप व परिसरातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागास खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर यश मिळवून गावाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा दुध संचालक सुरेश हसापुरे यांनी केले, 

येथील न्यू गोल्डन क्लबच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सुरेश हसापुरे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच अनिता कोरे होत्या.


या कार्यक्रमात गुणवंत खेळाडूंचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच भगवान व्हनमाने, सहायक पालिस निरीक्षक प्रशांत हुले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिध्द मुगळे, आर . के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड, ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे, यासीन मकानदार, आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन ख्याडे, अखिल भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष जावेद आवटे, सेवादलाचे तालुकाध्यक्ष उमाशंकर रावत, वंचितचे तालुकाध्यक्ष सचिन फडतरे, ज्येष्ठ पत्रकार अमोगसिद लांडगे, पत्रकार अमोगसिद मुंजे, अनिल जोडमोटे, कुरघोटचे माजी सरपंच भागण्णा अटकर, उद्योजक शिवानंद कालदे, निलेश हेळकर, प्रिती कोरे, प्रविण कुंभार, उमाशंकर रावत, शिवराज मुगळे आदी उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबलू शेख यांनी केले तर सूत्रसंचालन व‌ आभार पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांनी केले.