सोलापूर : प्रधानमंत्री सुरज योजना समाज कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून देशातील मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी अनुसूचित जातीच्या व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी वैयक्तिक लाभ, सफाई कामगारांच्या सरंक्षणासाठी पीपीई किट आयुष्यमान कार्ड या योजनेच्या माध्यमातून विकास घडवण्याचा संदर्भात मागासवर्गीय लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ऑनलाईन संवाद साधला.
नियोजन भवन येथील सभागृहात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांच्या सह अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय कल्याण मंडळाचे विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.
.
यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या अंगीकृत महात्मा फुले महामंडळ अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास महामंडळ व महानगरपालिका सफाई कामगार आयुष्यमान कार्डचे लाभार्थी यांच्या विकासासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागनाथ चौगुले महामंडळाचे व्यवस्थापक पवार यांच्या उपस्थितीत महामंडळाच्या लाभार्थ्यांना ०१ लाख ते १० लाखापर्यंत चे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना PPE किटचे वाटप व आयुष्यमान कार्डचे वाटपही यावेळी करण्यात आले.
नवी दिल्ली सामाजिक न्याय विभागाचे समन्वय अधिकारी सिंग महामंडळाचे व्यवस्थापक पवार यांच्या उपस्थितीत ३१० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे सांगितले. या कार्यक्रमासाठी सातारा, सांगली आणि सोलापूर येथील लाभार्थी उपस्थित होते.