सोलापूर : उसनवारीने दिलेल्या लाख रुपयांसाठी रस्त्यात अडवून जावेद सिकंदर शेख व त्याच्या साथीदारांनी काठी, लोखंडी सळई आणि हॉकी स्टीकने जबर मारहाण करून त्याची कार जबरदस्तीने नेल्याच्या दाखल गुन्ह्यात आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयानं आरोपीचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज मंजूर केला.
या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की, गुन्ह्यातील फिर्यादीने आरोपी जावेद शेख याच्याकडून सप्टेंबर २०२३ मध्ये एक लाख रुपये हातउसने घेतले होते. त्या रकमेसाठी जावेद शेख व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीस पापणी फाटा येथे रस्त्यात अडवून त्यास काठी, लोखंडी सळई आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण करून त्याच्याजवळील XUV 500 कार जबरदस्तीने घेऊन गेले होते.
आरोपी जावेद शेख व त्याच्या साथीदारांनी केलेल्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या जखमीकडील ०५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली होती. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी ३१ डिसेंबर २०२३ रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपितांविरुद्ध भा.द.वि. कलम ३२७,३२५,३२४,१४७,१४८,१४९,५०४ ,५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी जावेद सिकंदर शेख याने अॅड. कदीर औटी यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी, ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले.