Type Here to Get Search Results !

होळी सणाला सिलबंद मद्यविक्रीची वाढविली वेळ रंगपंचमीनिमित्त मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद


सोलापूर : रंगपंचमी उत्सवानिमित्त सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने शनिवारी, ३० मार्च रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी मद्य विक्री दुकाने व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत.

तसेच होळी या सणाच्या दिवशी रविवारी, २४ मार्च रोजी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील एफएल-२, एफएलबिआर-२ व एफएलडब्ल्यू-२ या सिलबंद मद्य विक्री अनुज्ञप्त्यांची वेळ रात्री १०.३० वाजलेवरुन  रात्री १२.०० वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे. महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम मधील कलम १४२ (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश निर्गमित केले आहेत.