सोलापूर : केंद्रीय विधी व न्याय विभाग, भारत सरकार यांचे वतीने महाराष्ट्र राज्याकरिता नोटरी अधिकारी यांची नियुक्ती यादी, १४ मार्च रोजी प्रसिद्ध झाली. यामध्ये सोलापूर येथील ॲड. मुंजरीन शेख-माशाळे यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती करण्यात आलीय.
ॲड. मुंजरीन शेख-माशाळे ह्या सोलापूर न्यायालयात वकिली व्यवसाय करीत असून ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. त्यांच्या नियुक्तीचे सोलापूर परिसरातून स्वागत करण्यात येत आहे. या निवडीबद्दल ॲड. मुंजरीन शेख-माशाळे यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.