सोलापूर : अन्न व औषध प्रशासनाकडून एप्रिल २०२३ ते १९ मार्च २०२४ या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात ४१ ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीमधील गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू या प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा सुमारे ६३, ७२, ०४७ रूपयांचा साठा नष्ट करण्यात आला असल्याचे अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी सांगितले.
हा साठा बुधवारी, २० मार्च रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील मे. किर्ती ॲग्रोटेक कंपनीच्या आवारात मोकळ्या जागेत जाळून नष्ट करण्यात आला. यावेळी अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई, सुनिल जिंतुरकर, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोणपे, श्रीमती रेणुका पाटील, उमेश भुसे व श्रीमती नंदिनी हिरेमठ तसेच सोलापूर तालुका व मंद्रुप पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी हे उपस्थित होते.